“तो आमच्या जमान्यात असता तर…”, Shoaib Akhtar ला विराटच्या क्षमतेवर शंका

Shoaib Akhtar | पाकिस्तानी संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. क्रिकेट विश्वातील चालू घडामोडींवर भाष्य करून अख्तर प्रसिद्धी मिळवत असतो. कधी कधी तर तो भारतीय खेळाडूंवर खालच्या पातळीवर टीका करताना दिसतो. आता मात्र अख्तरने विराट कोहलीचे कौतुकही केले आहे आणि त्याच्या काळातील क्रिकेट अन् आताचे क्रिकेट यातील फरक सांगितला आहे. विराटला आमच्या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असता असे त्याने सांगितले.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने विराट कोहलीचे तोंडभरून कौतुक केले आणि विराटने शतकांमागून शतके झळकावीत अशी माझी इच्छा असल्याचे म्हटले आहे. परंतु अख्तरने असेही म्हटले आहे की, विराटने आमच्या काळात क्रिकेट खेळले असते तर त्याला अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला असता. आताच्या घडीला विराट सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत शिखरावर आहे.

विराटच्या क्षमतेवर शंका!

सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने अलीकडेच महान सचिन तेंडुलकरचा वन डेतील 49 शतकांचा विक्रम मोडला. खरं तर वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक 50 शतके झळकावणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे. वन डे विश्वचषक 2023 मध्ये किंग कोहलीने ही किमया साधली. कोहलीने मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून वन डेतील आपले 50 वे शतक पूर्ण केले.

दरम्यान, पाकिस्तानच्या शोएब अख्तरने कोहलीचे कौतुक केले. त्याचवेळी आजचे क्रिकेट पाहता आजचे क्रिकेट आमच्या काळातील क्रिकेटपेक्षा सोपे असल्याचे अख्तरने सांगितले. आता जर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळत असता तर त्याने भरपूर धावा केल्या असत्या. आताच्या तुलनेत आमच्या काळातील क्रिकेट खूप आव्हानात्मक होते, असेही अख्तरने सांगितले.

Shoaib Akhtar कडून ‘विराट’ कौतुक

अख्तरने ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, विराट जर आमच्या काळात असता तर त्याला आव्हानांचा सामना करावा लागला असता. पण तो चांगला प्रतिस्पर्धी आहे. विराट हा विराटच आहे. त्याने 100 शतके झळकावीत अशी माझी इच्छा आहे. विराटने आमच्या काळातही अशीच खेळी केली असती. पण वसिम अक्रम सारख्या गोलंदाजांचा सामना करणे कठीण काम होते.

तसेच आता सचिन तेंडुलकर खेळला असता तर त्याने खूप धावा केल्या असत्या, सचिन, रिकी पाँटिंग, ब्रायन लारा हे महान फलंदाज आहेत. विराट जर आमच्या काळात खेळत असता तर तो चांगला खेळला असता, पण त्याला अडचणींना सामोरे जावे लागले असते. मात्र, विराटने अजूनही चांगल्या धावा केल्या असत्या, अशी कबुली देखील अख्तरने दिली.

News Title- Former Pakistan fast bowler Shoaib Akhtar has praised Indian team player Virat Kohli
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | स्वप्नपूर्ती! साक्षात रामलला आज घरी आले; बाळाला जन्म दिलेल्या महिलांची भावना

Virat Kohli ची अयोध्येत एन्ट्री! रस्त्यावर जमली एकच गर्दी, Video Viral

Ram Mandir | चेहऱ्यावर हिजाब अन् मुखी जय श्री राम! 1400 किमी पायी प्रवास; मुंबईची तरूणी अयोध्येत दाखल

Entertainment News | बच्चन कुटुंबातील वादामागचं खरं कारण आलं समोर!

Ram Mandir | मी पण राम मंदिराच्या आंदोलनात होतो, त्यामुळे मलाही…- गुणरत्न सदावर्ते