बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतातील नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो, परिस्थिती लवकर सुधारेल- शोएब अख्तर

नवी दिल्ली | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. या परिस्थितीवर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने प्रतिक्रिया दिली आहे.

भारतातील नागरिकांसाठी मी प्रार्थना करतो. परिस्थितीत लवकर सुधारणा होईल, अशी मी अपेक्षा करतो आणि भारत सरकार या संकटाशी मुकाबला करेल. या कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत, असं म्हणत शोएब अख्तरनं भारतीयांना धीर दिला आहे.

शोएब अख्तर अनेक वेळा भारताविरोधात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतो. मात्र यावेळी कठीण काळात आपण सर्व एकत्र आहोत, असं वक्तव्य शोएब अख्तरनं केलं आहे. त्याने या संदर्भात ट्विट केलं आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. या घटनेवर देखील शोएबने दु:ख व्यक्त केलं होतं.

दरम्यान,भारताच्या मदतीसाठी अनेक शेजारील राष्ट्रही पुढे येत आहेत. कोरोनाची महासाथ ही संपूर्ण मानवांची शत्रू आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाला या महासाथीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. कोरोना महासाथीच्या प्रादुर्भावातून भारताला वाचवण्यासाठी आपण तयार असल्याचं चीननं म्हटलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

महामारीच्या काळात ‘या’ पेयांनी वाढवा रोग प्रतिकारशक्ती; जाणून घ्या अधिक माहिती

‘राहुल गांधी म्हणजे राजकीय विनोदरत्न’; चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

‘ऑक्‍सिजन’साठी कोल्हापूर-सातारा आमने-सामने; दोन जिल्हाधिकाऱ्यांमध्ये वाद

सुश्मिता सेनने उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर्स; चाहत्यांनाही केलं मदतीचं आवाहन

“अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More