खेळ

भारताचा हा गोलंदाज सध्याचा सर्वोत्तम गोलंदाज- शोएब अख्तर

Loading...

इस्लामबाद | भारतीय गोलंदाजांनी गेल्या काही सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या तालावर नाचवलं आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने शमीचं तोंडभरून कोतुक केलं आहे.

मोहम्मद शमी हा चतुर गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला मोहम्मद शमी हा जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे. तुम्ही त्याला कोणत्याही प्रसंगात गोलंदाजी करायला द्या तो तुम्हाला चांगले निकाल देतो, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

विश्वचषक स्पर्धा असो किंवा न्यूझीलंडमधील सामने असो शमीला गोलंदाजीत नेमके कधी बदल करायचे आहेत हे माहिती आहे. ज्यावेळी त्याला समजतं की एखाद्या खेळपट्टीवर यॉर्कर चेंडू काम करणार नाही, त्यावेळी तो लगेच चेंडूचा टप्पा आणि दिशा बदलतो, असं शोएबने म्हटलं आहे.

दरम्यान, न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने सुपरओव्हरमध्ये बाजी मारली आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताकडे सध्या 4-0 अशी आघाडी आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

अर्थसंकल्प सादर करताय की कवितांचा कार्यक्रम?; काँग्रेसचा सीतारामन यांना सवाल

शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणार; मोदी सरकारचा संकल्प

महत्वाच्या बातम्या- 

एलआयसीमधील मोठा हिस्सा विकणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात आहेत ‘या’ मोठ्या घोषणा!

आता मोबाईलसारखं वीजेसाठीही आधीच रिचार्ज करावं लागणार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या