नवी दिल्ली | आम्ही आधी काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू, असं वादग्रस्त वक्तव्य पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने केलं आहे.
अख्तरचं हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. याआधीही शोएब अख्तरने भारताविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
शोएबच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी शोएबवर टीका केली आहे.
नदी दोनदा रक्तानं लाल होईल. अफगाणिस्तानहून सेना अटॉकपर्यंत पोहोचेल. उझबेकिस्तानहून विविध तुकड्या पोहोचतील. हा सगळा भाग ऐतिहासिक क्षेत्र खोरासनशी संबंधित असून तो लाहोरपर्यंत पसरला आहे, असं अख्तरनं मुलाखतीत म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
आमदारकी नाही मिळाली तरी काम करत राहणार- ऊर्मिला मातोंडकर
ब्रिटनहून परतलेली बेपत्ता कोरोनाबाधित महिला आंध्रात सापडली!
नाईट कर्फ्यूवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?”
राजधानी दिल्लीला आज पहाटे पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये खळबळ