Top News खेळ

कोहलीला रनआऊट करण्यावरून शोएब अख्तरची अजिंक्य रहाणेवर टीका; म्हणाला…

मुंबई | टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. दरम्यान या सामन्यात अजिंक्य रहाणेने ज्या पद्धतीने विराट कोहलीला रनआऊट केलं ते पाहता अनेकांनी रहाणेवर टीका करण्यात येतेय.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनेही अजिंक्य आणि विराटमध्ये झालेल्या या गोंधळावरुन रहाणेवर टीकास्त्र सोडलंय.

शोएब अख्तर म्हणाला, “खेळताना अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात गोंधळ झाला. अजिंक्य रहाणेने कर्णधार विराट कोहलीला जसं बाद केलं ते म्हणजे त्याला एका पद्धतीने त्याला मारल्यासारखंच होतं.”

“जर कोहली त्यावेळी मैदानात खेळत असता तर त्याने 150-200 धावा सहज केल्या असत्या. त्याच्या या धावांमुले भारताला अधिक चांगली चांगली आघाडी मिळाली असती. दुसऱ्या डावात भारताकडे पुनरागमन करायची चांगली संधी होती,” असंही शोएब अख्तर म्हणाला.

थोडक्यात बातम्या-

संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख; म्हणाले…

मुंबईकरांनी खूप भोगलंय, आणखी त्रास नको; फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना जोडले हात!

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

माझ्या मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मी अहंकारी आहे- उद्धव ठाकरे

सातारच्या पाटलानं पटवली ‘कश्मीर की कली’; ‘हा’ अडथळा दूर होताच उडवला बार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या