बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मला रडू येतंय आणि मला झोप येत नाहीये, आमदार असल्याची लाज वाटतीये”

नवी दिल्ली | दिल्लीतील माटिया महल विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार शोएब इकबाल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचा आहेर दिला आहे. काँग्रेससोबतच भाजपच्याही ट्विटर हँडल्सवरून हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

आज मला दिल्लीची परिस्थिती पाहून रडू येत आहे. रात्रभर मला झोप येत नाहीये, असं आमदार शोएब इकबाल यांनी म्हटलंय. लोकांना दिल्लीत ऑक्सिजन मिळत नाहीये, औषधं मिळत नाहीयेत. माझा मित्र यावेळी दिल्लीच्या न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात तडफडतो आहे. त्याच्याजवळ ना ऑक्सिजन आहे ना व्हेंटिलेटर आहे. रात्रीपासून माझ्याकडे औषधांची चिठ्ठी आहे. मी त्याला कुठून रेमडेसिविर आणून देऊ?, असं शोएब इकबाल म्हणाले.

देव करो आणि त्याचं काही बरं-वाईट न होवो. मुली रडत आहेत. सगळं आहे, पैसा आहे पण त्याला औषधं मिळत नाहीयेत. ऑक्सिजन मिळत नाहीये, असं शोएब इकबाल यांनी सांगितलं. तसेच दिल्लीतील यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, शोएब इक्बाल यांची राष्ट्रपतीची राजवटीची मागणी केजरीवाल सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजपनेही शोएब इक्बाल यांच्या मागणीचं समर्थन केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

चक दे पट्टे! विराट कोहली, मॅक्सवेल आणि डिव्हिलियर्सला बाद करत हरप्रीतने फिरवला सामना, पाहा व्हिडीओ

ये नया पंजाब है! पंजाबने विराटच्या बंगळुरूचा केला पराभव

मास्कसंदर्भात नव्या सूचना, प्रत्येकाला ‘या’ सूचना माहितच असायला हव्यात!

“केंद्राने दुजाभाव केला असता, तर लसीकरणात राज्य आघाडीवर असतं का?”

हाही काळ निघून जाईल, पुढे सोन्याची झळाळी निश्चित येईल- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More