सानिया मिर्झाचा एक्स नवरा शोएब मलिकने केली मोठी घोषणा; म्हणाला, “पुन्हा एकदा..”

Shoaib Malik | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने तिसऱ्यांदा लग्न केलं. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळेच सानियाने त्याला ‘खुला’ दिला. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नाचा संसार थाटला आहे. सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाला आता जवळपास सहा महीने होत आली आहेत. अशात शोएब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सानिया मिर्झा हिचा एक्स पती आणि पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब मलिक याने मोठी घोषणा केली आहे. शोएबच्या या निर्णयाची आता सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे. त्याने पुन्हा एकदा मैदानात उतरणार, असल्याची घोषणा केली आहे.

शोएब मलिक याने केली अत्यंत मोठी घोषणा

“मला पुन्हा पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व करायचे आहे. मला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळायचे आहे. मी माझ्या देशासाठी सर्व प्रयत्न करेन. मला फक्त पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे.”,असं शोएब मलिक म्हणाला आहे.

पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शोएबने (Shoaib Malik) ही घोषणा केली आहे. सध्या टी 20 विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पाकिस्तानने म्हणावी तशी कामगिरी केली नाहीये. त्यामुळे संघावर प्रचंड टीका केली जात आहे.

शोएब पुन्हा पाकिस्तान क्रिकेट संघात दिसणार?

आता शोएबच्या वापसीबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या अनेक दिवसांपासून शोएब हा संघातून बाहेर आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो पाकिस्तानी क्रिकेट संघातून बाहेरच आहे.

अशात शोएबने (Shoaib Malik) पुन्हा एकदा संघात वापसी करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता  पाकिस्तान क्रिकेट बोर्ड याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष असेल. शोएब सध्या 42 वर्षांचा असून त्याने अजूनही निवृत्ती घेतली नाही, त्यामुळे तो लवकरच पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसू शकतो.

News Title-  Shoaib Malik Made Big Announcement

महत्त्वाच्या बातम्या –

“आरक्षण दिलं नाहीतर तुम्हाला संपवणार…”, मनोज जरांगे संतापले

महायुतीत अजित पवारांना एकटं पाडण्याचा डाव?, नाशकात शिंदेंच्या सेनेला झुकतं माप

“मोदींहून सुप्रिया सुळेंना अधिक लीड”; पवारांनी मोदींना डिवचलं

केंद्र सरकार पंकजा मुंडे संदर्भात ‘हा’ मोठा निर्णय घेणार!

पावसाळ्यात होणाऱ्या केसगळतीमुळे त्रस्त आहात?; करा ‘हा’ उपाय