बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गोरं मूल जन्माला यावं म्हणून सानियाने…’, शोएब मलिकचा खुलासा

मुंबई | आपलं मूल दिसायला गोरं पान असावा अशी जवळपास सर्वच पालकांची इच्छा असते. त्यामुळे स्त्री गरोदर असली की तिला वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. याला भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) देखील अपवाद ठरली नाही.

मूल गोरं जन्माला यावं यासाठी सानियाला सफरचंद खाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सानियाने तिच्या गरोदरपणात भरपूर सफरचंद खाल्ले आहेत आणि याचा खुलासा खुद्द सानियाचा पती व पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) याने केला आहे.

‘शान-ए-सुहूर’ नावाच्या एका पाकिस्तानी मॉर्निंग शोमध्ये बोलत असताना शोएबने सानियाच्या गरोदरपणातील काही गमतीदार किस्से सांगितले आहेत. मुल गोरं होण्यासाठी सानियाच्या आईने तिला भरपूर सफरचंद खाण्याचा सल्ला दिला असल्याचा खुलासा शोएबने केला आहे.

दरम्यान, 2010 साली शोएब मलिक व सानिया मिर्झा यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2018 साली सानियाने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. शोएब व सानियाने त्यांच्या मुलाचं नाव इजहान असे ठेवले आहे.

थोडक्यात बातम्या-

सिनेसृष्टी हादरली, मुलाच्या मृत्यूच्या 2 महिन्यातच ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे…”

LIC ची भन्नाट योजना! फक्त 73 रूपये गुंतवून मिळू शकतात 10 लाख रूपये

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचा मोठा दावा

राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झलक आली समोर, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More