खेळ

शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

हैदराबाद |   जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सध्या बऱ्याचश्या ठिकाणी बंद आहे. इंटरनॅशल विमानांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात बंद आहे. याचमुळे पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकला त्याची पत्नी सानियाला भेटता येत नाहीये.

कोरोनाचा भारतात संसर्ग सुरू झाल्यापासून भारतात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्या देशातून भारतात एन्ट्री मिळणं जिकीरीचं काम झालं आहे. परंतू गेल्या 5 महिन्यांपासून शोएबने त्याची पत्नी आणि मुलाची भेट घेतलेली नाहीये.

मुलाची आणि पत्नीची भेट घेण्यासाठी शोएब आतुर झाला आहे. परंतू त्याचे कोरोना रिपोर्ट अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे तो सध्या भारतात येऊ शकत नाहीये. कोरोनाचे अहवाल आल्यानंतर भारतात येण्यासंबंधी तो रितसर परवानगी घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचं सांगितलं जातंय.

दरम्यान, येत्या 28 जूनला पाकिस्तानी खेळाडूंचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या दौऱ्यावर जाण्याआधी शोएब पत्नी सानियाला भेटून जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

शुभमंगल साssवधान!, लग्नासाठी बोलावलेल्या पाहुण्यांपैकी 15 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह

महत्वाच्या बातम्या-

…तरच मुंबई पुण्याची गर्दी कमी होईल, संजय राऊतांनी गडकरींना ठणकावलं

गडकरींचं एक वक्तव्य अन् संजय राऊतांनी वाचून दाखवला मुंबईचा सारा इतिहास!

तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या