चिंचवडमधील धक्कादायक प्रकार; कारमध्ये सापडली ‘इतक्या’ लाखांची रोकड

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

चिंचवड | भाजप आमदार (Bjp Mla) लक्ष्मण जगताप (Bjp Mla Laxman Jagtap) यांच्या निधनाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा (Announcement) करण्यात आली आहे.

चिंचवडमध्ये आज एका कार (Car) मध्ये तब्बल 43 लाखांची रोकड सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे आणि कुणी आणली याचा तपास सुरू आहे. अशात एक धक्कादायक प्रकार समोर आला.

दळवी नगर परिसरात निवडणूक विभागाच्या अधिकारीकडून केल्या जाणाऱ्या तपासणीत एका कारमध्ये 43 लाख रुपयांची रोकड मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

संबंधित रक्कम कुठे नेली जात होती. याची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचले असून तपास सुरू आहे.

दरम्यान, चिंचवडमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं दिसतंय. यामध्ये भाजप उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये ही लढत असणार आहे. तीनही प्रमुख उमेदवार कोट्याधीश असल्याची माहिती शपथपत्रातून समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-