बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेसबुकवरील मैत्रीनं घातला 2 लाखांचा गंडा; नंतर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य 

औरंगाबाद | औरंगाबादेत एक अतिशय धक्कादायक कृत्य उघडकीस आलं आहे. फेसबुकवर ओळख झाल्यानंतर घरी येऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद येथील बजाजनगर या ठिकाणी घडली आहे. एवढंच नाही तर आरोपी तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून 25 वर्षीय पीडित तरुणीची 2 लाख रुपयांची फसवणूक देखील केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित फसवणूक करणाऱ्या 28 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव रोहन राजेंद्र खाजेकर असून तो औरंगाबाद येथील मुकुंदवाडीतील रहिवासी आहे. तर पीडित तरुणी कामानिमित्त मुंबईला राहते. दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून पीडित तरुणीची ओळख आरोपी खाजेकर याच्यासोबत झाली होती. बरेच दिवस फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यावर आरोपी खाजेकर पीडितेला भेटण्यासाठी मुंबईलाही आला. त्याचबरोबर औरंगाबादमधील प्रोझोन मॉलमध्येही दोघांची भेट झाली होती.

आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवून सातत्यानं पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. मार्च महिन्यात पीडित तरुणी बजाजनगर येथे घरी असताना, आरोपी तरुणानं डबा घेण्याचं कारण देत पीडितेच्या घरात गेला. यावेळी पीडित मुलगी घरात एकटी होती. या संधीचा फायदा घेत आरोपीनं पीडितेवर बलात्कार केला. घटनेनंतर पीडितेनं आरोपीला फोन केल्यावर त्यानं बोलण्यास आणि लग्न करण्यास नकार दिला.

दरम्यान, फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर, काही दिवसांनी आरोपी तरुणानं पीडित तरुणीची त्याच्या आईशी बोलणं करून दिलं. यावेळी आरोपीच्या आईनं पीडितेला सांगितलं की, तू मुंबईत नोकरी करत आहेस, लग्नानंतर संसारासाठी पैसे लागतील. त्यामुळे तू काही पैसे माझ्या मुलाकडे पाठवत जा. त्यामुळे पीडित तरुणीनं आरोपी खाजेकरला महिन्याला 10 ते 12 हजार रुपये पाठवले आहेत. तिने साधारणतः दोन लाख रुपये आरोपीच्या खात्यावर पाठवले. पैसे पाठवूनही खाजेकर यानं लग्नास नकार दिला, असं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास

विधवेवर पोलिसाकडूनच बलात्कार, गावकऱ्यांनी असा शिकवला धडा

कोरोनाचा राग, रेमो डिसूझावर निघाला! कोरियोग्राफर हसून हसून लोटपोट झाला, पाहा व्हिडीओ

राज्यात 4 दिवस पावसाचा इशारा; अरबी समुुद्रातलं ‘तोक्ते’ चक्रीवादळ ‘या’ किनारपट्टीवर धडकणार

परमबीर सिंह यांना अटक करणार?; राज्य सरकारची न्यायालयात मोठी माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More