बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण

उस्मानाबाद | ओमिक्राॅनच्या धास्तीनं राज्यात चिंतेचे वातावरण झालं आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात कडक निर्बंध करण्यात येणार आहे. ओमिक्राॅन (Omicron) व्हेरिएंटनं राज्याचं टेंशन आणखीनच वाढवलं आहे.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग लक्षात घेता आता प्रशासनानं महत्त्वाची पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. ओमिक्राॅनचा वाढता धोका पाहता काही ठिकाणी लाॅकडानही (Lockdown) जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमायक्रॉनचे आणखी 2 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे जिल्ह्यात आता ओमायक्रॉनचे 5 रुग्ण झालेत. यातील आता सापडेलल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 31 वर्षीय व्यक्ती आहे तर दुसरा रुग्ण त्याचाच 2 वर्षीय मुलगा आहे.

दरम्यान, 2 वर्षीय चिमुकल्यालाही ओमिक्राॅनची लागण झाल्यानं सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यामुले आता ओमिक्राॅविषयी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…’;

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

मस्तच ना! आंतराळातील हेअर कटिंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More