बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कायदायक! लॉकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मारायला लावल्या 300 दंड बैठका; तरूणाचा जागीच मृत्यू

मनिला | भारतासह जगभरातील कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कोविड लाॅकडाऊन देखील लावण्यात आला आहे. लोकांकडून कोरोनाच्या नियमाचे पालन केलं जावं यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यानिमित्तानं पुन्हा एकदा लोकांना 2020 च्या वेळी रस्त्यावर जे पोलिस आणि जनतेचं चित्र दिसलं होतं, त्याची आठवण झाली आहे.

फिलीपीन्समधून अशीच एक धक्कादायक घटना समेर आली आहे. एका व्यक्तीनं कोरोनाचा नियम मोडल्याने पोलिसांनी या माणसाला दंड बैठका मारण्याची शिक्षा दिली. 300 दंड बैठका मारल्यानंतर या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना 1 एप्रिलला घडली आहे.

‘मेट्रो न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार या माणसाचं नाव डॅरेन पेनारेडोंदो असून वय 28 वर्ष होतं. घरातलं पाणी संपल्यामुळे नाईलाजाने हा माणूस रस्त्यावर उतरला होता. त्याचवेळी स्थानिक पोलिसांनी त्याला रस्त्यावर अडवलं आणि शिक्षा म्हणून दंड बैठका काढायला लावल्या.

दरम्यान, सुरूवातीला पोलिसांनी 100 दंड बैठका मारायला लावल्या. लगेचचं या माणसाने ही शिक्षा पूर्ण केली. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा शिक्षा वाढवत या तरूणाला 300 बैठका मारायला लावल्या. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण जेव्हा ही व्यक्ती घरी पोहोचली तेव्हा अवस्था खूपच खराब होती. अंगात ताल नसल्याने त्याने जागीच आपले प्राण सोडले. या माणसाला एक लहान मुलगा सुद्धा आहे.

थोडक्यात बातम्या – 

नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

5 वर्ष शिक्षक अल्पवयीन मुलीवर करायचा बलात्कार; निवृत्त झाल्यानंतर तिच्यासोबतच केलं असं काही…

‘कोरोना लसींबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी बोलावं’; फडणवीसांनी राजेश टोपेंना सुनावलं

मागेल त्याला कोरोनाची लस द्या; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची मागणी

क्या बोलता क्या चीज है पैसा! ; आयपीएलचे हे तीन संघ करतात ‘इतक्या’ कोटींची कमाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More