बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! गुजरातमधून 400 कोटींचे हेराॅइन जप्त, 6 पाकड्यांना पकडलं

गुजरात | आतापर्यंत गुजरातमधून अनेक ड्रग्ज प्रकरणं समोर आली आहेत. अशातच आता परत एकदा आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्ज तस्करी (Drugs) गुजरातमध्ये (Gujrat) पकडण्यात आली आहे. आता गुजरातमध्ये भारतीय तटरक्षकदल आणि गुजरात एटीएसने (ATS) संयुक्त कारवाईत तब्बल 400 कोटी रुपयांचे हेरॉइन जप्त केलं आहे.

गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेवेळी पाकिस्तानी बोट अल हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई केली. या कारवाईत त्यांना 400 कोटी रुपयांचे हेरॉइन आढळलं.

या कारवाईत भारताच्या जल हद्दीत 6 चालकांसह पाकिस्तानी नाव (Boat) ताब्यात घेण्यात आली आहे. पाकिस्तान पूर्वी काश्मीर आणि पंजाबमधून भारतात ड्रग्ज पाठवत असे, मात्र काही काळापासून काश्मीर आणि पंजाबमध्ये कडक कारवाई केल्यामुळे पाकिस्तान समुद्रमार्गे भारतात ड्रग्ज पाठवण्याचा प्रयत्न करत आहे, असं एटीएसचं म्हणणं आहे.

दरम्यान, काही काळापासून ड्रग्ज प्रकरण मोठ्य प्रमाणावर समोर येत आहेत. याशिवाय या प्रकरणांमध्ये अनेक मोठे नावही समोर येत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

अश्लील व्हिडीओप्रकरणी अखेर राज कुंद्रानं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला…

“2014 ला शिवसेनेला दूर करा असं भाजप नेत्यांना खासगीत सांगणारे कोण होते?”

धक्कादायक! अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीचा समन्स, ‘या’ प्रकरणात नाव आलं समोर

“2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या…”रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली

‘बाजारू अमोल मिटकरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तळवे चाटून झाले असेल तर…’; राम सातपुतेंचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More