बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

पुणे | पुण्यातील कात्रज भागात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलानं आपल्याच जन्मदात्याची हत्या केली आहे. अगदीच क्षुल्लक कारणावरून ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलानं रागाच्या भरात वडिलांच्या पोटात चाकू खूपसून हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

कात्रज येथील जांभूळवाडीतील रहिवासी दस्तगिर यांच्या घरी ही धक्कादायक घटना घडली आहे. दस्तगीर यांचा 13 वर्षाचा मुलगा आणि त्यांची मुलगी या बहिण भावांमध्ये काही कारणानं भांडण झालं होतं. त्यामुळे दस्तगीर यांनी मुलाला हाताने एक चापट मारली. मात्र वडिलांनी आपल्याला मारलं याचा त्याला प्रचंड राग आला. राग अनावर झाला आणि त्यानं स्वत:च्याच वडिलांची चाकू खूपसून हत्या केली.

बहिणीबरोबर झालेल्या भांडणातून वडिलांनी आपल्यालाच मारलं म्हणून दस्तगिर यांच्या मुलाचा राग डोक्यात गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. घरात जाऊन चाकू आणला आणि सरळ दस्तगिर यांच्या पोटात खुपसला. यात दस्तगिर यांचा जागी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दस्तगिर हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. या घटनेमुळं मात्र परीसरातील नागरीकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तर दस्तगिर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

थोडक्यात बातम्या

‘गांगुली स्वार्थी होता, त्याला…’; ग्रेग चॅपेल आणि सौरव गांगुली यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

कोरोनानंतर ‘हा’ गंभीर आजार झाल्याची जगातील पहिलीच घटना, डाॅक्टर आणि वैज्ञानिकही अचंबित

ATS प्रमुख जयजीत सिंग यांची ठाणे पोलीस आयुक्तपदावर नियुक्ती

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाला 1 लाख रूपये देणार; मध्य प्रदेश सरकारची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More