बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! व्हिडीओ बनवण्याच्या नादात स्वतःलाच पेटवून घेतलं

नवी दिल्ली | सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस प्रमाणाबाहेर गेला आहे. परिणामी माणूस तंत्रज्ञानाच्या आहारी गेला आहे. त्यात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी म्हणून लहान-मोठे सगळेच कुठल्याही थराला जाताना दिसत आहे. रिल्स, टीक टॉक सारखे अॅप माणसाला वेड लावणारे आहेत. त्यावर काहीतरी हटके करायचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो.

वेगळेपण दाखवायच्या नादात अगदी स्वतःच्या जीवाशी खेळ करायलाही काही लोक मागे-पुढे पाहात नाहीत. अशीच एक घटना समोर आली आहे. एका 13 वर्षीय मुलीनं टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात स्वतःलाच पेटवून घेतलं आहे. ही मुलगी टिकटॉकवर एक फायर चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. ही घटना अमेरिकेच्या पोर्टलँड येथील आहे.

टिकटॉक व्हिडिओ बनवताना डेस्टिनी क्रेन या 13 वर्षीय मुलीचा हात आणि मान गंभीररित्या भाजली आहे. टिकटॉक व्हिडिओ बनवताना आग लावण्याची ट्रिक चुकीची झाल्यानं ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बाथरुमध्ये आरशाच्या समोर उभा राहून आगीपासून वेगवेगळे आकार बनवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या कुटुंबीयांचं असं म्हणणं आहे, की ब्लास्ट झाल्यामुळे डेस्टिनीला दुखापत झाली आहे.

दरम्यान, डेस्टिनीच्या आईनं सांगितलं, की त्यांना बाथरुममध्ये 1 मेणबत्ती, 1 लायटर आणि दारुची बाटली सापडली. त्यांनी सांगितल्याप्रमाणं, ही घटना घडली तेव्हा त्या हॉलमध्ये त्यांच्या आईसोबत बोलत होत्या. डेस्टिनीचा आवाज ऐकून त्यांनी बाथरुमकडे धाव घेतली असता त्यांना दिसलं की तिथं आग लागली आहे. मुलीसोबतच बाथरुममधील इतर वस्तूंनीदेखील पेट घेतला होता. त्यानंतर ही आग लगेचच विझवण्यात आली. डेस्टिनीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनावर मात करत वसईतील 25 वर्षीय तरुणानं माऊंट एव्हरेस्टवर फडकवला तिरंगा!

ब्रिटनच्या राजघराण्यात राजकुमारीचं आगमन, प्रिन्स हॅरी अन् मेगनला कन्यारत्न

काळ्या बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावतीत ‘हा’ नवा पॅटर्न

ब्लॅक फंगसपासून वाचायचं असेल तर ‘या’ पदार्थांचं सेवन करू नका; डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More