बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

मुंबई | मुंबईमधील जोगेश्वरी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने अवघ्या 5 वर्षाच्या मुलीला आपल्या विकृतीचं शिकार बनवल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर आजू-बाजूच्या परिसरात देखील याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

जोगेश्वरी येथील बेहराम परिसरातील ही घटना आहे. संबंधित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरातील वरच्या मजल्यावर भाड्याने राहतात. 5 वर्षाची मुलगी रोज त्यांच्या घरी टिव्ही पाहायला जायची. घर मालकाचा मुलगा अर्थात आरोपी हा मेडिकलचे शिक्षण घेतो. संबंधित आरोपीचं नाव सुनिल सुखाराम गुप्ता असं आहे.

गुरुवारी संध्याकाळी संबंधित मुलगी आपल्या घर मालकाच्या घरी रोजप्रमाणे टिव्ही पाहायला गेली. यादरम्यान, घरी फक्त आरोपी सुनिल होता. लहान मुलीच्या भोळेपणाचा फायदा घेत सुनिलने ती घरी आल्यानंतर काही वेळाने घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर सुनिलने 5 वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार केला. थोड्या वेळाने मुलगी रडत घरी गेल्यावर आईने विचारणा केली. यावेळी मुलीने संपुर्ण प्रकार सांगितला.

दरम्यान, संबंधित 5 वर्षाच्या मुलीच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी सुनिलला अटक देखील केली आहे. मात्र सर्वत्र याबाबत संताप असल्यामुळे स्थानिकांनी सुनिलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने गाठला नवा उच्चांक

खोट्या कारणाने ई-पास बनवणाऱ्यांनो सावधान; पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

कोरोना ओसरण्यास महाराष्ट्रातूनच सुरुवात होणार; तज्ज्ञांनी नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

भारतात असणाऱ्या अमेरिकन नागरिकांना जो बायडेन यांचा अलर्ट; तात्काळ मायदेशी परतण्याच्या सूचना

राज्यात कोरोनाचा धोका वाढला; 24 तासात तब्बल इतक्या कोरोनाबाधितांचा मृत्यु

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More