बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! शेजारी राहणाऱ्या जोडप्याने पाळीव कुत्र्याचे चक्क गुप्तांग कापले

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे क्रूरपणाचा कळस पार पडल्याचं चित्र समोर आलं आहे. माणसांवरचे अत्याचार तर कमी होण्याचं नाव नाही. अशातच आता एका पाळीव कुत्र्यावर देखील अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. कानपूरमधील एका जोडप्यानं एका पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याची घटना उघडकीस आली आहे.

रसुलाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सूजानपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.येथील परिसरात एका घरी कुत्र पाळलं आहे. त्यांच्या शेजारील एका जोडप्याने या कुत्र्याचं गुप्तांग कापल्याचं त्यांना समताच कुत्र्याच्या मालकाने जोडप्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

मालक घरी असताना अचानक कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आला. मालकाला आवाज जाताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोचताच कुत्रा रक्तबंबाळ होऊन जखमी अवस्थेत सापडला. त्यानंतर त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आलं. आता त्या कुत्र्यावर उपचार चालु आहेत.

दरम्यान, संबंधित घटनेबाबत पोलीस  तपास करत आहेत. तसेच जर कुत्र्याच्या मालकाने केलेले आरोप खरे ठरले तर संबंधित आरोपी जोडप्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांच्यावर कलम 429 अंतर्गत गुन्हा दाखल होईल, असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबई-कोलकाता सामन्यात असं काय झालं की, शाहरूख खानला मागावी लागली माफी !

‘…तरच रेमडेसिविरचा वापर करा’; कोविड टास्क प्रमुखांनी डॉक्टरांना हात जोडून केली विनंती

“आखिर तुम केहना क्या चाहते हो?” निलेश राणेंना आठवला 3 इडियट्सचा डायलाॅग

‘महाराष्ट्र सरकारने आधार कार्ड पाहून रुग्णांवर उपचार करावे’; ‘या’ काँग्रेस नेत्याची मागणी

धक्कादायक! डोक्यात फरशी घालून सासऱ्याने केली सुनेची हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More