बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मित्रानेच केली मित्राची हत्या; कारण ऐकूण तुम्हीही व्हाल हैराण

मुंबई | मुंबईत एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऑनलाईन लुडो खेळताना झालेल्या वादातून एकानं मित्राचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर, मित्राच्या मृत्यूनंतर बोरिवलीतील एका रूग्णालयात जाऊन आरोपीनं खोटा मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मृत व्यक्तीच्या कुटुंबाला अकस्मात मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 मार्च 2021 रोजी 52 वर्षीय तुकाराम नलवडे आणि त्यांचा 34 वर्षीय मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी हे मालाडमधील दारुवाला कंपाऊंड परिसरात मोबाईलवर लुडो गेम खेळत होते. या खेळात तुकाराम सारखे जिंकत असल्यामुळे आरोपी अमित त्यांच्यावर नाराज झाला. यावरुन दोघांमध्ये खूप मोठा वाद झाला. रागाच्या भरात वादाचं रूपांतर मारहाणीत झालं आणि अमितनं तुकारामला इतकी जबरदस्त मारहाण केली की, तुकाराम नलवडे याचा जागीच मृत्यू झाला.

मृत तुकाराम नलवडे याची शोकसभा सुरु असताना तिथे हजर असलेल्या एका शेजाऱ्यानं हा प्रकार सांगितला. शेजाऱ्यानं मृत व्यक्तीच्या पत्नीला सांगितलं की, हा नैसर्गिक मृत्यू नसून मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करुन कलम 302 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, शेजाऱ्यानं शोकसभेत अमितचं पितळ उघडं पाडलं आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. तुकाराम यांच्या मृत्यूनं अमित चांगलाच घाबरला होता. त्यानं बोरिवलीतील एका खासगी रूग्णालयामधील रुग्णवाहिका चालकाची मदत घेतली. त्याला दहा हजार रुपये देऊन तुकाराम नलवडे यांच्या नैसर्गिक मृत्यूचा बनावट दाखला बनवून घेतला. तो मृत्यूचा दाखला नलवडे यांच्या परिवाराला दाखवला आणि त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं भासवलं. त्यानंतर तुकाराम नलवडे यांच्या पार्थिवावर मालाडच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारही करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या

कोरोनाबाधित आईसोबत राहण्यासाठी मुलाचा हंबरडा, जिल्हाधिकाऱ्याचे धरले पाय!

कोब्रा कमांडो नक्षलवाद्यांच्या ताब्यात; सहिसलामत सोडण्यासाठी घातली ‘ही’ अट

कोरोनावर मात करण्यासाठी शरद पवारांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन

आता नक्षलवाद्यांचं काही खरं नाही; अमित शहा म्हणाले…

योगी आदित्यनाथांनी शिवी दिल्याचा आरोप; ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More