Top News महाराष्ट्र यवतमाळ

धक्कादायक! रुग्णालयासह पोलिसांनी देखील जिवंत महिलेला मृत घोषित केलं!

यवतमाळ |  शहरालगतच्या मोठ्या वडगाव परिसरातील शांतीनगर भागात राहणाऱ्या उज्ज्वला राजेश वानखेडे या माहिलेने विषप्राशन केले. उपाचारादरम्यान ही महिला जिवंत असतानाच तिचा मृत्यू अहवाल पोलिस ठाण्यात पाठवण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

स्थानिक दैनिकात आपल्या मृत्यूची बातमी वाचून उज्ज्वला हादरल्या व त्यांनी तातडीने पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तिथे गेल्यावर समजले की, पोलिसांनीही कोणतीच खातरजमा न करता, ‘मर्त्य डायरी’त मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती समोर आली.

कागदोपत्री मृत महिला समोर उभी पाहून पोलिस अवाक् झाले व त्यांनी आपली घोडचूक मान्य केली. पोलिसांसह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनानेही उज्ज्वला या महिलेला कागदोपत्री पूर्ववत जिवंत केले.

महत्वाच्या बातम्या-

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर खासदार संभाजी राजेंचं उत्तर, म्हणाले…

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

रामविलास पासवान यांचं निधन हे माझं वयैक्तिक नुकसान, मी माझा मित्र गमावला- नरेंद्र मोदी

दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला- उद्धव ठाकरे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या