बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ‘या’ ठिकाणी सापडला कोरोनाचा नवा व्हेरिएंट

नवी दिल्ली | गेल्या दोन वर्षापासून जगभरात कोरोना (Corona) महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे जगभरात लसीकरण मोहिम राबवल्या जात आहे. या लसीकरणामुळे (Vaccination) बऱ्याच प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे.

कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली असतातना दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा 22 जणांना संसर्ग झाला आहे. हा नवा व्हेरिएंट अद्याप किती धोकादायक आहे हे समोर आलेलं नाही. याविषयी अधिक संशोधन सुरु आहे.

सरकारी तसेच खासगी प्रयोगशाळांना सरकारने तातडीने जिनोम सिक्वेंन्सिंग करण्याचे आदेश दिले आहेत. हा व्हेरिएंट किती संक्रमक, धोकादायक आणि परिणामकारक आहे हे समजू शकेल. अशातच या नव्या व्हेरिएंटला B.1.1.529 हे कोडनेम देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीज (NICD) नुसार हा व्हेरिएंट अधिक संक्रामक असू शकतो.

दरम्यान, कोरोना आटोक्यात आला असला तरी कोरोनाचा धोका काही कमी झालेला नाही. लाॅकडाऊन उठवल्यापासून लोकांनी पुन्हा एकदा गर्दी करायला सुरुवात केली. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना संसर्ग पसरायला सुरुवात झाली.

थोडक्यात बातम्या – 

“मी पवार साहेबांवर प्रेम केलं, मी त्यांचा माणूस असं…”

“उत्पादन वाढवा मार्केट निर्माण करण्याची जबाबदारी माझी”, गडकरींचं शेतकऱ्यांना आवाहन

“हिंदुंची मंदीरं तोडली जाणार असतील तर आम्ही…”; भाजप आमदाराचा इशारा

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारीबाबत ‘ही’ माहिती आली समोर, वाचा एका क्लिकवर

मुख्याध्यापकाचं निलंबन मागे घ्या; 521 विद्यार्थी आझाद मैदानावर काढणार मोर्चा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More