बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! कोरोनानंतर आता ‘या’ नव्या विषाणूचा होतोय शिरकाव

तिरुअनंतपुरम | देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत दिसत असतानाच तीसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावण झाले आहे. अशातच आणखी एक नव्या विषाणूची एण्ट्री झाली असल्याची बातमी समोर येत आहे.

या नवीन विषाणूचं नाव झिका असं आहे. केरळमध्ये आतापर्यंत 13 जणांना झिकाची लागण झाली आहे. त्यात एका गर्भवतीचा समावेश आहे. ही महिला ज्या रुग्णालयात उपचार घेत होती, तिथल्याच काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले असता ते देखील पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं जात आहे.

‘एडिस एजिप्ती’ या डासाच्या भारतीय प्रजातीपासून जीवघेण्या झिका विषाणूचा प्रसार होऊ शकतो. या डासाच्या दंशामुळे झिका विषाणू शरीरात प्रवेश करतो. ताप, डोकेदुखी, अंगावर रॅशेस येणे, डोळे लाल होणे अशी प्राथमिक लक्षणे आहेत. हा डास चावल्यावर दोन ते सात दिवसांत लक्षणे दिसायला सुरुवात होते.

दरम्यान, संसर्ग झालेल्या 24 वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या व्हायरसचा गर्भवती महिलांमधून त्यांच्या पोटातील बाळांना देखील संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांना अधिक काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

कौतुकास्पद! कोरोना संकटात ‘या’ शाळा मालकांनी 1000 विद्यार्थ्यांची वर्षभराची फी केली माफ

“…आता मंत्रालयाला त्यांच्या साड्यांची बिलं भरावी लागणार नाही”

सर्वोच्च स्तरापेक्षा सोनं तब्बल 8211 रुपयांनी घसरलं; वाचा ताजे दर

ईशा देओल ‘या’ वेबसीरीजमधून करणार डिजीटल क्षेत्रात पदार्पण!

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत झाली लक्षणीय घट

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More