बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस आला समोर, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

लखनऊ | सध्या देशात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. कोरोनानंतर ब्लॅक, व्हाईट आणि येलो फंगसची समस्या उद्भवली आहे. याच व्हायरस सोबत दोन हात करत असतानाच आणखी एका व्हायरसचं निदान झालं असल्याचं समोर येत आहे.

नवीन व्हायरसचं नाव हर्पिस सिम्प्लेक्स असून भारतात याचा पहिला रुग्ण आढळला आहे. कोरोनासारखाच हा व्हायरसही जीवघेणा असल्याचं सांगितलं जात आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील एका रुग्णालयात या व्हायरसची लागण झालेला रुग्ण सापडला आहे.

या रुग्णाच्या नाकात हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस सापडला आहे. भारतातील हे पहिलंच प्रकरण आहे. हा व्हायरस खूपच खतरनाक आहे. जर यावर वेळीच उपचार झाले नाही तर कोरोनापेक्षाही जीवघेणा ठरू शकतो. या रुग्णावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असं गाझियाबादमधील डॉ. बीपी त्यागी यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोनातून बऱ्या झालेल्या ज्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे किंवा त्यांना आधीपासून दुसरा आजार आहे, त्यांना हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरसचा धोका जास्त आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; तब्बल 50 लाखांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

कौतुकास्पद! ‘या’ अभिनेत्यानं दत्तक घेतलेल्या गावात राबवली लसीकरण मोहिम

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”

कोरोना लस घेतल्यावर बेशुद्ध झाला व्यक्ती अन्…, पाहा मजेशीर व्हिडीओ

अनाथांना 1 टक्के आरक्षण मिळणार?; आजच्या कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More