बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसला…’; शिवसेना खासदाराचा धक्कादायक आरोप

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. कोरोना रूग्णांसाठी राज्य सरकारने भारतातील विविध राज्यातून ऑक्सिजन आणण्यास सुरवात केली आहे. तर केंद्र सरकारला विनंती करून जलद गतीने ऑक्सिजन वाहतूक करण्याची विनंती देखील केली होती. यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राला रेलमार्गाने ऑक्सिजन वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर देशातली पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस धावली. आता हीच ऑक्सिजन एक्सप्रेस फिरवली जात आहे, असा धक्कादायक आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

देशात कोरोनाचं संकट असताना केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाकडून राजकारण केलं जातयं, पण हे राजकारण गरिबांच्या जिवावर येताना दिसत आहे. कारण राज्यासाठी ऑक्सिजन आणण्यास गेलेल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला फिरवलं जातंय, असा धक्कादायक आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे. ग्रीन काॅरिडोर करून ऑक्सिजन एक्सप्रेस आणली जाईल असं सांगण्यात आलं  होतं, परंतू असं होताना दिसत नाही, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

19 एप्रिलला निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस मंगळवारी रात्री 24 तासानंतरही अकोला स्टेशनवरच होती. आता ती गाडी रायपूर जवळ आहे. या गाडीला विशाखापट्टणमला जायचं आहे, पण ती दुसरीकडून लांब लांब फिरवून आणली जात आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन येण्यासाठी आणखी तीन दिवस लागतील, असं सावंत म्हणाले. केंद्र सरकारची क्रुर आणि कपटनीती चालू आहे, त्यामुळे केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन हा पर्याय नाही असं सुचवलं होतं. पश्चिम बंगालच्या निवडणूका संपल्यानंतर देशात लाॅकडाऊन लागेल असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘भिक मागा, चोरी करा पण रुग्णांना ऑक्सिजन द्या’; दिल्ली उच्च न्यायालयाने मोदी सरकारला सुनावलं

‘महाराष्ट्राला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा’; राजेश टोपे यांची मोदींकडे मोठी मागणी

खळबळजनक! एकाच रूग्णालयातील 384 डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला कोरोनाची लागण

रसेल,कमिन्सने झोड झोडं झोडलं पण चेन्नईला गोलंदाजांनी तारलं, चेन्नईचा 18 धावांनी विजय

अवघ्या दोन तासातच उरका लग्न अन्यथा भरावा लागेल इतक्या हजारांचा दंड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More