Top News चंद्रपूर महाराष्ट्र

शीतल आमटेंच्या सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबावर धक्कादायक आरोप

चंद्रपूर | डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येने प्रत्येकाला धक्का बसला होता. अशातच शीतल आमटेंचे सासु-सासरे यांनी आमटे कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली होती. मात्र त्यांनी ही पोस्ट डीलीट केली आहे.

ज्या दिवशी गौतम-शीतलचे लग्न झाले त्या दिवसापासून शीतलला मी माझी मुलगीच मानले. आम्ही आता त्याच हक्काने काही प्रश्न विचारत आहोत. शीतलला काही मानसिक ताण आणि नैराश्य आहे तर तिला सांभाळून आपुलकीने जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटलं जात आहे?, असा सवाल करण्यात आला आहे.

ज्या आनंदवनात लोकांची काळजी घेतली जाते मग सख्ख्या मुलीबाबत बोभाटा का?, की यामागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे?, असंही पोस्टमध्ये म्हटलं आहे,

दरम्यान, शीतल यांचे पती यांनी ही पोल्ट त्यांच्या आईने लिहिली असल्याचं सांगितलं असल्याची माहिती आहे. मात्र घटनाक्रमावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

डीलीट केलेली फेसबुक पोस्ट-

“हे पत्र मी दोन दिवसांपूर्वीच लिहिले होते आणि आज तिच्या कुटुंबियांनी (संपूर्ण आमटे परिवार) तिला दिलेला त्रास सहन न झाल्यामुळे तिने स्वतःला संपवले…… The End.

25-11-2020 च्या अनेक पेपरमधे शीतलच्या मानसिक आजाराबद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले आणि आश्चर्य पण वाटले.

यावर काही प्रतिक्रिया द्यावी की चूप रहावे हे कळत नव्हते. परंतु शेवटी विचार केला की शीतल ‘आमटे’ असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे, तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल?

आमटे कुटुंबाने (तिच्या स्वतःच्या आई-वडिलांनी आणि काका-काकूंनी) तिचाबद्दल असे संयुक्त निवेदन (स्वाक्षरी करुन) द्यावे यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणखी काय असू शकते.

ज्या दिवशी गौतम-शीतलचे लग्न झाले त्या दिवसापासून शीतलला मी माझी मुलगीच मानले. आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबीयांना काही प्रश्न विचारते.

1. शीतलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे, असं तुम्हीच लिहिले आहे, मग जर शीतलला आज काही मानसिक ताण आणि नैराश्य आहे, तर तिला सांभाळून आपुलकीने जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे ?

कारण आनंदवनात सगळया handicapped (mental/ physical) लोकांची काळजी घेतली जाते मग सख्ख्या मुलीबाबत बोभाटा का ? की यामागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे??

डॉ. प्रकाश आमटे यांना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणीशी संवाद साधता आला नाही त्यांना ?

सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय ?

2. कौस्तुभ आमटे यांना परत विश्वस्त मंडळावर घेतले. मला विचारावेसे वाटते की त्यांना काढले का होते ???

खास गोष्ट म्हणजे ज्या सगळया ट्रस्टींनी त्यांना काढले, त्यांनीच परत घेतले. तर आमच्यासारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की त्याला ट्रस्टी म्हणून काढण्यामागचे कारण काय होते ??

आता परत घेतले तर त्यांनी अशी काय विशेष कामगिरी केली ???

मागच्या 4-5 वर्षांपासून तर कौस्तुभ आमटेंचे नावही कुठे वाचण्यात आले नाही. इतकी वर्ष ते होते कुठे?

की आमटे कुटुंबही सर्वसामान्य माणसांप्रमाणे मुलगा (घराण्याचा वारस) आणि मुलीमध्ये फरक करतात ???

आज मी सर्वांना खुले आवाहन करते की आनंदवनला जावे आणि शीतल-गौतम यांनी जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे. आणि मग काय ते ठरवावे.

आमटेंसारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला-मुलींमध्ये फरक करावा ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. नाही का ?

(Late Activist Sheetal Amte-Karajgi’s in-laws writes an angry letter to the Amte Family)

उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचें त्यास द्यावें, एवढें लक्षांत ठेवा।
ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढें लक्षांत ठेवा।

कौस्तुभ आमटेंच्या बाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील.

ज्या प्रचंड गती आणि डेडीकेशनने आज आणि मागच्या अनेक वर्षांपासून शीतल आणि गौतम यांनी आनंदवनात काम केले आहे, त्याला तोडच नाही. त्याबद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो.

इथे मला आमटे लोकांना आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो की एक मानसिक नैराश्य असलेली व्यक्ती एवढे प्रचंड जबाबदारीचे काम कसे काय करू शकेल?

आज आत्ता मी आनंदवनातच आहे आणि शीतल-गौतम शिवाय इथे आमटे कुटुंबातील एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नाही. तिच्या व्यतिरिक्त एकही डॅाक्टर नाही. शीतल एकटीच दवाखान्यातील सगळ्या आजारी लेप्रसी पेशंटची काळजी घेते आहे.

मग ती जर स्वत: मानसिकरित्या आजारी आहे (तिच्या आई-वडिलांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे) तर सगळे आमटेज तिच्या भरोशावर पूर्ण आनंदवन सोडून हेमलकसाला काय करत आहेत ?

सगळे आमटे शीतल-गौतमच्या विरुद्ध कट-कारस्थान तर रचत नाही ना ?

विकास आमटे आणि प्रकाश आमटेंबद्दल हे सगळं लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी, हे माझे दुर्भाग्यच आहे.

त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी एवढेच माझे म्हणणे आहे.

शीतलला कसलाही मानसिक त्रास नाही आणि हा त्रास तिच्यावर जबरदस्ती लादला जात आहे. तो पण तिच्या सख्ख्या आई-वडिलांकडून हे तिचं खरं दुर्भाग्य आहे.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आमचे पूर्ण करजगी कुटुंब सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि पुढेही राहू.

सुहासिनी करजगी

शिरीष करजगी

महत्वाच्या बातम्या-

तुटवडा की छपाई बंद???; आता एटीएममध्ये मिळणार नाहीत ‘या’ नोटा!

“मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही, मराठा समाजाचं नुकसान होऊ नये हीच माझी प्रमाणिक भावना”

“बाप तरी दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ही वेळ आली आहे… मराठा आरक्षण दिरंगाईला….

संजय राऊत लिलावती रूग्णालयात होणार दाखल; अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय

कोरोना लस कधी येणार माहिती नाही, पण…- राजेश टोपे

मुंबईला मिळालेला बॉलिवूडचा दर्जा संपणार नाही- नवाब मलिक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या