बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! स्वप्नील लोणकर पाठोपाठ आणखी एका MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे | एमपीएससी (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर (Swapnil Lonkar) या युवकाने आत्महत्येसारखं (Sucide) धक्कादायक पाऊल उचललं होतं. यामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली होती. अशातच आणखी एका एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील दौड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आता दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील मल्हारी नामदेव बारवकर (Malhari Barwarkar) या युवकाने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. एमपीएससी (MPSC) करणाऱ्या विद्यार्थ्याच्या या धक्कादायक पाऊलानं सगळीकडे खळबळ उडाली आहे.

एमपीएससीची तयारी करणाऱ्या मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्यानं एमपीएससीच्या दोन तीन परिक्षा दिल्या होत्या. नैराश्यातून त्यानं ही आत्महत्या केल्याचं समजतंय. आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं एक सुसाईड नोटही लिहिली होती.

मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पूर्ण करु शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहेरही पाहू शकत नाही. आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलंच जगण्याचा सगळ्या आशा संपल्या आहेत. Sorry… असं लिहित मल्हारीनं आपलं जीवन संपवलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! काल रात्री अचानकपणे मुख्यमंत्र्यांची विधानभवनाला भेट, शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच बाहेर

‘या’ भागातील विद्यार्थ्याला कोरोनाची लागण, शाळा केली आठवड्याभरासाठी बंद

रोहित-विराटला मोठा झटका! सर्वोत्तम प्लेइंग इलेवनमध्ये स्थान नाही

कर्जतचं राजकारण तापलं! ‘शरद पवारांचा वारसा असूनही…’, चंद्रकांत पाटलांचा टोला

आनंदाची बातमी! सीरमच्या ‘कोवोवॅक्स’ लसीला WHO ची मान्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More