बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, त्यानंतर तिने जे केलं त्याने सर्वच हादरले

भोपाळ | देशामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. दररोज या विषयांच्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडत असतात. अशातच मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

एका विवाहित महिलेनं नवरा, सासू आणि दोन वर्षाच्या मुलासमोर पाण्यात उडी मारली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या खारगोनमध्ये घडली असल्याचं समजतंय. मंगळवारी 25 मे रोजी नदीत उडी घेतलेली महिला आपल्या पतीसोबत मंडलेश्वरला माहेरी जात होती. त्यावेळी त्यांच्यासोबत त्या महिलेची सासू आणि दोन वर्षाचा मुलगाही होता.

माकडखेडा पुलावर येताच महिलेनं नवऱ्याला गाडी थांबवायला सांगितली. त्यानंतर तीने पुलावरून उडी मारली. हे सगळं अचनाक आणि वेगात घडलं असल्यामुळे त्या महिलेच्या कुटुंबियांना काही कळलंच नाही. महिलेनं उडी मारताच पतीने आरडा-ओरडा करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर राधेश्याम नाव असलेल्या तरूणानं महिलेला उडी मारताना पाहिलं. त्यानं कोणताही विचार न करता महिलेचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. त्यानंतर राधेश्यामनं महिलेला सुखरूप पाण्याबाहेर आणलं. काहीवेळानंतर त्या महिलेला शुद्ध आली असून, महिलेची प्रकृतीही व्यवस्थित असल्याचं समजत आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारा मागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच प्रवासात त्या महिलेचा आपल्या पतीसोबत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला असल्यामुळे, तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या-

बीएमसीने काढलेल्या ‘या’ ग्लोबल टेंडरला एकूण 8 कंपन्यांचा प्रतिसाद पण…

स्वत: गर्भवती असूनही 9 महिने केली रुग्णांची सेवा, प्रसुतीवेळी कोरोनाने नर्सचा मृत्यू आणि….

“असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली”

ठाकरे सरकारचा मोठा आणि महत्वाचा निर्णय; ‘या’ दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश

‘या’ ठिकाणी सांडपाण्यात कोरोनाचा विषाणू मिळाल्यानं भीतीचं वातावरण!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More