बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मुंबईत बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रूग्णाचे डोळे उंदराने कुरतडले

मुंबई | घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एक रुग्णाचे डोळे चक्क उंदराने कुरतडल्याचे समोर आलं आहे.

श्रीनिवास यल्लपा असं या 24 वर्षीय रुग्णाचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी त्याला राजावाडी पालिका रुग्णालयात दम लागत असल्यानं दाखल केलं होतं. त्याला मेंदूज्वर, आणि लिव्हर खराब असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी डोळे तपासले असता त्यांना डोळ्याला उंदराने कुरतडल्यासारखे दिसून आलं. याबाबत त्यांनी रुग्णालयातील नर्सला सांगितलं असता त्यांनी त्यांना उद्धट उत्तरं दिल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या आरोपानंतर आता या प्रकरणावर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. रूग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांचा व आजूबाजूचा भाग कुरतडला गेला आहे. याची पूर्णपणे चौकशी केली जाईल. ही गंभीर बाब आहे. असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, आयसीयू रूम हा तळ मजल्यावर असल्यानं इथे उंदरांचा वावर आहे आणि प्रथम दर्शनी ते उंदरानं चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करीत असल्याचं राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांनी सांगितले आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

पैज लावून सांगतो देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नाही- राकेश झुनझुनवाला

सरकार कोरोनाला नाही तर विरोधकांना घाबरत आहे- चंंद्रकांत पाटील

‘कॉलेज आणि विद्यापीठात मोदींचे आभार मानणारे फलक लावावेत’; युजीसीकडून विद्यापीठांना निर्देश

राहुल गांधींचा मोदी सरकारवर टीकेसाठी नाहीतर मदतीसाठी हात पुढे; म्हणाले…

“सरकार अधिवेशनापासून पळ काढतय, या पळपुट्या सरकारचा जाहीर निषेध”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More