बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! विधानभवनासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई | राज्यातील हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु झालं असून आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. अशातच एक धक्कादयक माहिती समोर आली आहे.

एका महिलेने विधानभवानच्या मुख्य द्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. ही घटना घडत असतानाच पोलीसांनी पुढे येत त्या महिलेला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे आता सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव राजलक्ष्मी असं आहे. राजलक्ष्मी नाशिक येथील युवा स्वाभिमान पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष आहे. त्यांच्या कुटुंबावर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वारंवार याविषयी बोलूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, अंगावर राॅकेल आतण्याचा प्रयत्न करत त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. आता सध्या त्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता या प्रकरणी काय पाऊलं उचलली जातील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ‘या’ भागात 2 वर्षाच्या चिमुकल्याला Omicronची लागण

‘लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…’;

‘मांजर आडवं गेले तरी…’; नितेश राणेंच्या म्याव म्याववर शिवसेनेचं टीकास्त्र

सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा; वाचा आजचा सोने-चांदीचा ताजा भाव

धक्कादायक! Omicronपासून वाचण्यासाठी आता एका व्यक्तीला मिळणार ‘इतके’ डोस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More