‘तुला ऍडमिट करुन टाकू, गडबड नको’; शिवसेना नेत्याची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
पुणे | शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. 24 वर्षीय तरूणीला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुचिक यांच्यावर आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्या तरूणीला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला, असा आरोप देखील त्यांच्यावर आहे. प्रकरणातील पीडित तरूणीने पुणे पोलिसांकडे कुचिक यांच्याविरोधीत तक्रार दाखल केली होती.
पोलिसांकडून या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. रघुनाथ कुचिक बलात्कार घटनेतील 2 दोन दिवसांपासून गायब असलेली मुलगी गोव्यात सापडली. इंजेक्शन देऊन काही व्यक्तिंनी तिला महाराष्ट्राबाहेर नेलं ज्यात पोलिसांचा देखील समावेश होता, असं त्या तरूणीने चित्रा वाघ यांना फोन करून सांगितलं. चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.
राजकीय कटातून हा गुन्हा दाखल केला असून हा बदनामीचा व ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याचं कुचिक म्हणाले आहेत. या प्रकरणाला आता नाट्यमय वळण येत असताना रघुनाथ कुचिक व त्या तरूणीमधील संपूर्ण संभाषण व्हायरल होत आहे. त्यामुळे कुचिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कॉल रेकॉर्डिंगवरून ती मुलगी रूग्णालयात दाखल असल्याचं कळून येत आहे. कॉलवरील व्यक्ती त्या तरूणीला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून टाकू म्हणजे काही टेन्शनच नको, काही गडबड नको. बाकीचं नंतर पाहू आपण काय करायचं ते, असं म्हणत आहे. या रेकॉर्डिंगमधील आवाज कुचिक यांचाच आहे का?, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या रेकॉर्डिंगनंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.
व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंगमधील संभाषण-
पुरूष- ऐक
पीडित तरूणी- हा
पुरूष- आता तुला काय करू आपण, तुझी जी ती चिंचवडची डॉक्टर होती ना…
पीडित तरूणी- काय?
पुरूष- चिंचवडला गेलो होतो ना आपण ज्या डॉक्टरांकडे
पीडित तरूणी- हम्म
पुरूष- त्यांच्याकडे अॅडमिट करू टाकू तुला हॉस्पिटलमध्ये. म्हणजे टेन्शनच नको, काही गडबडच नको. बाकीचं नंतर पाहू आपण काय करायचं ते. तुला जेवढं सामान घ्यायचं तेवढं घे, तो माणुस तुला घेऊन जाईल गाडीत. तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन अॅडमिट होऊन जा. बाकीचं मी बघतो. ओके?
पीडित तरूणी- हम्म.
रघुनाथ कुचिक बलात्कार घटना
2दिवसांपासून गायब असलेली मुलगी
गोवा मडगावच्या कोलवा गावात सापडली
काल रात्री तिचा फोन मला आलेला
इंजेक्शन देऊन काही व्यक्ती ज्यात पोलिस ही होते पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक माहिती तीने मला दिली
यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलयं pic.twitter.com/lTwvHSjvZz— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) March 16, 2022
थोडक्यात बातम्या-
तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, जाणून घ्या आजचे ताजे दर
मोठी बातमी! जो बायडन यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
होळीच्या दिवशी पांढऱ्या कपड्यांना आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या या मागचं खरं कारण
रशियाला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
रशिया-युक्रेन युद्धावर डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.