बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून अत्यंत क्रूरपणे तरुणीवर केला सामूहिक बलात्कार

पाटणा | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच लसीकरण देखील चालू करण्यात आले आहे. एवढंच नाही तर आता 18 वर्षांवरील तरुणांना देखील लस देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. कोरोना काळात देखील गुन्ह्यांची संख्या कमी होत नसून बलात्काराच्या देखील अनेक घटना समोर येत आहेत. अशाप्रकारे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लसीचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे.

बिहारमधील पाटणा येथे ही घटना घडली आहे. तरूणीला कोरोना लस देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी तिला जमुनापूर भागातील निर्जन घरात नेलं. तिथं नेल्यानंतर दोघांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. संबंधित आरोपींचं नाव राॅकी आणि मंटू असं आहे. एवढंच नाही तर यादरम्यान तरुणीने त्यांना नकार देऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला.

संबंधित तरुणीने पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपींनी सर्वप्रथम तिचे पाय बांधले. त्यानंतर तिचा आरडा ओरडा बंद करण्यासाठी तिच्या तोंडात रुमाल कोंबला आणि दोघांनी तिचे लैंगिक शोषण केले. बलात्कार केल्यानंतर दोन्ही आरोपी तिथून फरार झाले. काही वेळानंतर तरुणी कशीबशी तिच्या घरी पोचली. घरी जाताच तरुणीने संपुर्ण प्रकार आपल्या घरात सांगितला.

दरम्यान, तरुणीच्या घरातल्यांनी आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. फरार झालेल्या आरोपींची माहिती समजताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली आहे. तसेच तरुणीवर उपचार करण्यात आला आहे. तसेच पोलीस सध्या तरुणीच्या वयाचा तपास करत आहे. संबंधित तरुणीचं वय जर 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर आरोपींवर पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल.

थोडक्यात बातम्या-

18 वर्षांवरील लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ मोठं वक्तव्य

बाबो! …अन् चालू मॅचमध्ये सूर्यकुमार यादवने केलं पत्नीला किस

“धोनीनंतर मराठमोळा ऋतुराज गायकवाड होऊ शकतो चेन्नईचा कर्णधार”

धक्कादायक! टिव्ही पाहायला गेलेल्या 5 वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली भावाची हत्या, कारण अत्यंत धक्कायदायक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More