बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एक आजार ज्यामुळे आपलं होत आहे दगडात रुपांतर , ‘या’ चिमुकलीचं शरीर झालं दगडागत!

नवी दिल्ली | करोनामुळे विविध आजार समोर येत आहेत. ज्या आजारांच कधी नाव ऐकलं नाही, असे आजार अनेकांना होताना दिसत आहेत. त्यातच आता लंडनमधून एका अनोख्या आजाराची माहिती समोर आली आहे. या आजाराची शिकार पाच महिन्यांची चिमुरडी झाली आहे.

ब्रिटनमध्ये एका दुर्मिळ आजारामुळे पाच महिन्यांच्या चिमुरडीच्या शरिराचं रुपांतर दगडात होत आहे. या आजाराला Fibrodysplasia Ossificans Progressiva म्हणतात. या आजारामुळे माणसाच्या शरिराचं रुपांतर दगडात होतं. या चिमुरडीच्या पालकांनी जगभरातील पालकांना या आजाराच्या लक्षणासंदर्भात सावधतेचा इशारा दिला आहे.

या आजारामुळे मांसपेशी आणि हाडांना जोडणारे उतक हाडात बदलतात. त्यामुळे शरीर दगडासारखं कठोर होतं. वयाच्या २० वर्षांनंतर या आजाराने पीडित व्यक्ती आंथरुनावर पडतो. या आजारात रुग्ण 40 वर्षांपर्यंत जगू शकतो.  पीडित चिमुरडीचं नाव लेक्सी रोबिन्स आहे. हा दुर्मिळ आजार 20 लाख लोकांमध्ये एकाला होतो. लक्सिचा जन्म 31 जानेवारी रोजी झाला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांना मुलीच्या हाताच्या आंगठ्यांमध्ये हालचाल दिसून आली नाही तर पायाचे आंगठे मोठे झाले होते. डॉक्टरांना लेक्सीच्या आजार समजण्यासाठी बराच कालावधी लागला होता. शरीर कठोर झाल्यामुळे चिमुरडीला आता इंजेक्शन किंवा लस देणंही शक्य नाही. ती मोठी झाल्यानंतर बाळाला जन्म देऊ शकणार नाही. आता तज्ज्ञ डॉक्टर या लेक्सीचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?- देवेंद्र फडणवीस

…तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता- अण्णा हजारे

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर गजाआड

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

देशांतर्गत सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापार,वाचा आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More