बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सिगरेटचे चटके देत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; जाब विचारण्यासाठी गेलेल्या आईला…

मुंबई | मुंबई येथील डोंबिवलीत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढंच नाही तर मुलावर लैंगिक अत्याचार करत असताना आरोपीने त्याला चक्क सिगरेटचे चटके देखील दिले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगा हा अवघ्या 15 वर्षांचा आहे. संबंधित मुलगा हा डोंबिवलीतील रहिवासी आहे. संबंधित आरोपीचं नाव सावरे असं आहे. सावरे सतत पीडित तरुणाला काही ना काही कारणांवरुन घरी बोलवत असे. मात्र मुलगा दोन दिवस घरी परतलाच नाही. दोन दिवसांनी मुलगा घरी आल्यावर तरुणाच्या आईने त्याची चौकशी केली. यावेळी तरुण काहीच सांगत नव्हता.

तरुणाची चौकशी करताना आपला मुलगा प्रचंड तणावाखाली असल्याचं त्याच्या आईला जाणवलं. यामुळे त्याच्या आईने अधिक विचारपूस केली. तेव्हा तरुणाने आपल्यासोबत झालेला प्रकार सांगितला. हा प्रकार ऐकताच तरुणाच्या आईला प्रचंड धक्का बसला. सावरे यांनी तरुणाला एका खोलीत कोंडून सिगरेटचे चटके देत त्याच्यावर लैंगिक आत्याचार केला.

दरम्यान, याबाबतचा जाब विचारण्यासाठी तरुणाची आई सावरे यांच्याकडे गेली असता सावरे यांनी तिची बेदाम मारहाण केली. यानंतर तरुणाच्या आईने पोलीस ठाणे गाठलं. तसेच तरुणाच्या आईने पोलीस ठाण्यात सावरे यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी सावरे यांना अटक केली आहे.

थोडक्यात बातम्या-

अभिनेता भूषण कडूच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन!

फक्त ‘या’ कारणासाठी सलमानसोबत काम केलं; प्रवीण तरडेंनी सांगितलं आश्चर्यजनक कारण

मन सुन्न करणारी घटना; बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही कोरोनाने मृत्यू

आयपीएलच्या पुनरागमनानंतर राजस्थान राॅयलने शेअर केला भन्नाट व्हिडीओ; पाहा व्हिडीओ

चिंताजनक! कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट सापडला

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More