Kolkatta Rape Case | कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात लेडी ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या (Kolkatta Rape Case) प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफी टेस्ट सुरू आहे. त्याआधी शनिवारी याप्रकरणाशी जोडल्या गेलेल्या 6 जणांची पॉलीग्राफ टेस्ट झाली, ज्यात आरजीकर मेडिकल कॉलेजचे माजी प्रिन्सिपल संदीप घोष यांचाही समावेश आहे.
तुरुंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांनी ही चाचणी घेतली असून या चाचणीत संजय रॉय याने सर्व चुकीची उत्तरे दिल्याची माहिती समोर आली आहे.
“ती आधीच मृत झाली होती”
चाचणी दरम्यान संजय रॉयने दावा केला की तो दारूच्या नशेत होता. त्याने चुकून पीडितेला सेमिनार हॉलमध्ये पाहिलं. त्याने हेल्मेटने दरवाजा उघडला तेव्हा त्याने पाहिलं की ती आधीच मृत झाली होती. त्यामुळे तो घाबरून पळाला.
संजय रॉयला 8 आणि 9 ऑगस्ट दरम्यान घडलेल्या घटनांविषयी वारंवार प्रश्न विचारण्यात आले. पण त्याने बहुतेक प्रश्नांची उत्तरे खोटी आणि न पटणारी दिली आहेत, असं सीबीआयने म्हटलं आहे.
Kolkatta Rape Case | संजय रॉयकडून गुन्ह्याची कबुली
रॉयने यापूर्वी गुन्ह्याची कबुली दिली. त्याने चाचणीलाही संमती दिली. पण चाचणीदरम्यान त्याने चुकीची उत्तरे दिली. दरम्यान काही दिवसांपूर्वी सेमिनार हॉलमधील सीसीटीव्ही फुटेज सीबीआयच्या हाती आले होते. त्यानुसार गळ्यात ब्लुथूट इअरफोन घालून संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करत असताना दिसत आहे. त्यामुळे त्याची आता आणखी कसून चौकशी करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री राहुल गांधींच्या मागे?
आज पावसाचा ऑरेंज, यलो, रेड अलर्ट; ‘या’ भागात पाऊस धडकी भरवणार?
आमिर खान तिसरं लग्न करण्याच्या तयारीत?, स्वतःच केला मोठा खुलासा
आज कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
पुणेकरांनो सतर्क राहा! आज अतिवृष्टीचा इशारा, ऑरेंज अलर्ट जारी