बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भायखळा तुरुंगात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव; ‘इतक्या’ जणांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता मुंबईतल्या भायखळा तुरुंगात कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

मुंबईतील भायखळा तुरुंगात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तुरुंगातील 39 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व कैद्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये गर्भवती महिलांचाही समावेश आहे.

कोरोनाची लागण झालेल्यां 39 कैद्यांमध्ये 6 लहान मुलांचाही समावेश आहे. लागण झालेल्यांना जवळच्या एका शाळेतील कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान, भायखळा तुरुंगातील कैद्यांची क्षमता 262 आहे. जानेवारीच्या आकडेवारीनुसार तेथे 365 कैदी ठेवण्यात आले होते. त्यात 16 महिला कैद्यांवरील आरोप सिद्ध झालेले होते. तसेच डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार या तुरुंगात 66 परदेशी महिला कैद्यांनाही ठेवण्यात आलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“72 तासांत खिशातून सटकलेले अजित पवार भाजपला कसे झेपणार?”

पुढील तीन-चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

‘कोरोना लसीचा दुसरा डोस घ्यायचा विसरला असला तर…’, आरोग्य तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

मलाही बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता पण…- छगन भुजबळ

“…त्याहून निराश म्हणजे UN सभेत मोदींच्या भाषणावर कोणीही टाळी वाजवली नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More