बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनामुळं आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं तीन मुलं झाली अनाथ

लखनऊ | जगभर कोरोनानं थैमान घातलं आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या अधिक होती. त्यातच ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळालं. कोरोनानं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. कोरोनानं अनेकांना अनाथ केलं आहे. अशातच आणखी एकदा अशीच एक घटना समोर येत आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मोदीनगरमध्ये एक मन हेलावणारी घटना समोर येत आहे. कोरोनामुळं आई-वडिलांचं छत्र हरपल्यानं तीन मुलं अनाथ झाली आहे. कोरोनामुळं आईचा मृत्यू झाला. त्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वडिलांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं. मात्र कोणत्याही रुग्णालयानं त्यांना दाखल करून घेतलं नाही आणि याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सध्या ही मुलं आपल्या 82 वर्षीय आजोबांसोबत राहत आहेत. मुलांची जबाबदारी कोण घेणार, त्यांचं पुढे कसं होणार? याची चिंता सतावत असल्याचं आजोबांनी म्हटलं आहे. मुलीनं सांगितलं की मी शिक्षिका व्हावं अशी आई-वडिलांची इच्छा होती आणि मी ती पूर्ण करणार आहे.

दरम्यान, कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या मुलांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आई-वडील किंवा त्यापैकी एकाला गमावलेल्या मुलांना वयाच्या 18 व्या वर्षी मासिक सहायता राशी आणि वयाच्या 23 व्या वर्षी पीएम केअर्समधून 10 लाख रुपये देण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोना झालेल्या महिलेच्या हृदयातून काढली चक्क 7 सेंटीमीटरची गाठ

सकारात्मक बातमी! शनिवारी देशात गेल्या काही दिवसांतील सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

‘या’ अभिनेत्रीचा क्रिकेट खेळतानाचा मजेशीर अंदाज होतोय व्हायरल; पाहा व्हिडीओ 

हळद ते मिरवणुकीपर्यंत तरुणाच्या डान्सने घातला धुमाकूळ, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण देऊन अशोक चव्हाण यांचा राजीनामा 5 जुलैपर्यंत घ्या, नाहीतर…”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More