बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! मुंबईच्या रस्त्यावर कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण फिरतांना आढळले

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. अशातच अनेक जिल्ह्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा त्याशिवाय आता उपाय नाही, असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. अशाच बेजबाबदार लोकांना अद्दल घडवण्याच काम मुंबई प्रशासन करत आहे.

मुंबईच्या एम पश्चिम विभागात म्हणजे चेंबूर भागात दोन जणांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कारण या दोन व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह असतांना देखील खुलेआम रस्त्यावर फिरतांना आढळून आल्या आहेत. या दोघांनाही होम क्वारन्टाईन करण्यात आलं होतं, मात्र याकडे डोळेझाक करत ते रस्त्यावर भटकत होते. त्याचबरोबर त्यांनी हातावर होम क्वारन्टाईनचा शिक्का मारून घेण्यासही नकार दिला होता. म्हणून, चेंबूर विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने वाॅर्डातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या दोन्ही व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केली आहे. नियमांची पायामल्ली केल्यामुळे मुंबई महापालिकेने अशा लोकांविरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या रस्त्यावर कोरोना पाॅझिटिव्ह असतांना देखील भटकणाऱ्या व्यक्तींमध्ये एकाच नाव अजय तलरेजा असून त्यांचं वय 52 वर्ष आहे. त्यांच्या घरात त्यांची बायको, मुलगी आणि ते स्वत: कोरोना पाॅझिटिव्ह निघाले होते. तिघांनाही होम क्वारन्टाईन करण्यात आलं होतं. होम क्वारन्टाईन केलेल्या लोकांना महापालिका दिवसातून दोन चार वेळा फोन करते आणि प्रकृतीबाबत विचारपूस करत असते. क्वारन्टाईन केलेले व्यक्ती घरी आहे का? अशी विचारपूस केली जाते. यासंदर्भात महापालिकेने तलरेजा यांच्या घरी फोन केला असता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रतिसाद न देता उद्धटपणे उत्तर दिलं गेलं होतं. हाच प्रकार दुसऱ्या दिवशी एम पश्चिम विभागात घडला. कल्पेश गोसर नावाचा व्यक्ती होम क्वारन्टाईनच्या नावाखाली रस्त्यावर भटकत होता. म्हणून, चेंबूर येथील वसंत पार्क पोलिस ठाण्यात या व्यक्तींविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत पुन्हा ‘झिरो कोरोना’ मिशन सुरू झालं आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिक नियमांची पायामल्ली करत असल्यामुळे कोरोना रूग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने, मुंबईकर आम्ही आपल्यावर नजर ठेऊन आहोत आणि झिरो कोरोना’ मिशन साध्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि मास्कचा वापर करा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

धक्कादायक! भररस्यात घडलेल्या ‘या’ घटनेनं पुणे हादरलं

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्कार प्रकरणात अटक

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More