बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनाची लस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा काही वेळातच मृत्यू

मुंबई | देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा काही वेळातच मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. लसीकरणानंतर मृत्यू होण्याची ही मुंबईतील पहिलीच घटना आहे. मात्र, मृत्यूचे खरे कारण शवविच्छदन अहवालानंतरच कळेल, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

अंधेरी पश्चिमेकडील एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोरोनावरील लस घेण्यासाठी एका लसीकरण केंद्रात काल आले होते. लस घेतल्यानंतर काही वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, काल 5 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डाॅ. मंगला गोमरे यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या व्यक्तीला मधुमेहासह अन्य आजारही होते. त्यांचा मृत्यू कोरोनाच्या लसीमुळे झाला की अन्य कारणामुळे हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल. त्यानंतर हा अहवाल ‘एईएफआय’ समितीसमोर ठेवला जाईल. त्यानंतर समिती याबाबत निर्णय घेईल, असं गोमरे यांनी सांगितलं.

दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूट ही ‘कोविशिल्ड’ या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहेत. ही लस आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, अजून सात कोरोना लशींवर काम सुरु असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे.

थोडक्यात बातम्या –

गुड न्यूज! कोरोनाच्या स्ट्रेनवर ‘या’ देशाची लस प्रभावी

“अध्यक्ष महोदय मी दुखावलो गेलोय, राहुल गांधीना शाळेत पाठवण्यात यावं”

पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्यावर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांचं मोठं वक्तव्य!

…अन् भरबैठकीत नाना पटोले संतापले; ‘या’ मुद्द्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीवर व्यक्त केली नाराजी

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More