बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! आरोग्य अधिकाऱ्याने घेतली ‘कोरोना’ची लस अन् पाच दिवसातच…

अहमदाबाद | देशात ‘कोरोना’ लशीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. असं असताना गुजरातमध्ये आरोग्य अधिकाऱ्याने ‘कोरोना’ लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर तो 5 दिवसांत परत त्यांचा अहवाल ‘कोरोना’ पाॅझिटीव्ह आल्याची बाब समोर आली आहे. त्यांना सौम्य लक्षणे दिसत असून, सध्या त्यांना त्यांच्याच घरी विलगणीकरणात ठेवण्यात आलं आहे.

गांधीनगरमधील देहगाम तालुक्याचे आरोग्य अधिकारी ‘कोरोना’ पाॅझिटीव्ह आढळले आहेत. त्यांनी ‘कोरोना’ लशीचा पहिला डोस 16 जानेवारीला घेतला होता. त्यानंतर त्यांनी 15 फेब्रुवारीला दुसरा डोस घेतला होता. त्यानंतर त्यांना ताप आला. त्यांची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. ‘कोरोना’ लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 5 दिवसांत त्यांना ‘कोरोना’ संसर्ग झाल्याचे समोर आले.

जगातील सर्वात मोठ्या ‘कोरोना’ लसीकरणास 16 जानेवारीला देशात सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले होते. केंद्राने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात पहिले आरोग्य कर्मचारी, ‘कोरोना’च्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता.

दरम्यान, लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जात आहे. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांचाही यात समावेश आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागतील. यात 100 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश असेल, असे सरकारने जाहीर केले आहे.

थोडक्यात बातम्या –

‘अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना बांबूने झोडा’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

आजच्या काळातील ‘झाशीची राणी’; ‘या’ व्हिडीओमुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव

रिलायन्स नंतर आता ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस

बाबो! 8 वर्षीय मुलानं ‘ही’ गेम खेळून मिळवलेत तब्बल 24 लाख; सविस्तर वाचा…

उद्धव ठाकरेंनी स्वखर्चाने एखादी बालवाडी काढुन दाखवावी- नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More