बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना व्हायरसचा होऊ शकतो मेंदूवर परिणाम; धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेविषयी सतर्कता बाळगली जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आत्तापासूनच आवश्यक औषधे, वैद्यकीय उपकरणे शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेतली जात आहे. अशातच कोरोना संसर्ग होऊन गेलेल्या व्यक्तीला डोकेदुखी आणि डोक्याशी संबंधित इतर आजार होत असल्याचं दिसून येत आहे.

कोरोना संसर्ग होऊन गेला तरी काही रूग्णांमध्ये शरीरावर परिणाम झालेले दिसून येत आहेत. अनेकांना कोरोना होऊन गेल्यावर डोकेदुखीचा त्रास उद्भवतो. मात्र डोकेदुखी सामान्य आहे म्हणून अनेकजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. याविषयी बोलताना वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलं की, हे मेंदूच्या मोठ्या विकाराचं लक्षण असू शकतं.

सामान्य डोकेदुखी आणि कोरोनामुळं झालेली डोकेदुखी ओळखणं डॉक्टरांनाही शक्य होत नसल्याचं सांगितलं जातं. अशातच कोरोना संसर्ग झाल्यावर डोकं दुखत असेल तर न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डरचं लक्षण असू शकतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. खास करून जर कोरोना होऊन गेला असेल तर दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची लक्षणं दिसायला सुरुवात झाली आहे. लक्षणं जास्त प्रमाणात दिसत नसली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता फेटाळून लावता येऊ शकत नाही.

थोडक्यात बातम्या – 

बरं झालं स्वामी बोलले, नाहीतर राष्ट्रदोह झाला असता- यशोमती ठाकूर

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये अवघे ‘इतके’ रुग्ण सक्रिय

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने काढावेत”

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More