महिला दिनी हादरवून सोडणारी घटना समोर; हम्पीमध्ये परदेशी महिलेवर बलात्कार

Bopdev Ghat Gang Rape case big revelation of victim  

बंगळुरू | कर्नाटकच्या हम्पी (Hampi) येथे एक धक्कादायक घटना घडली असून, काही अज्ञात आरोपींनी एका इस्रायली पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. तसेच, त्यांच्यासोबत असलेल्या तिघांवर हल्ला करून त्यांना तुंगभद्रा कालव्यात फेकून दिले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी सापडला. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात बलात्कार, दरोडा, हल्ला आणि हत्येचा प्रयत्न या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

ही घटना गुरुवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सनापूर कालव्याजवळ घडली. घटनेच्या वेळी पीडित पर्यटक आणि त्यांचे सहकारी किनाऱ्यावर बसून गाणी ऐकत होते. त्याचदरम्यान तीन बाइकस्वार तिथे आले आणि त्यांनी जवळील पेट्रोल पंपाबाबत विचारणा केली. मात्र, तिथे कोणताही पंप नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी १०० रुपयांची मागणी केली.

पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत महिलांवर बलात्कार केला. सोबत असलेल्या तीन जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर हल्ला करून त्यांना तुंगभद्रा कालव्यात फेकून देण्यात आले. या तिघांपैकी दोघे जखमी झाले, तर बिबाश (Bibash) नावाचा ओडिशा (Odisha) येथील पर्यटक बेपत्ता झाला.

लूटमार करून आरोपी फरार

या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये डेनियल पिटास (Daniel Pitas) हा २३ वर्षीय अमेरिकन नागरिक आणि पंकज पाटील (Pankaj Patil) हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. दोघांना पोहता येत असल्याने त्यांनी किनाऱ्यावर पोहोचून आपला जीव वाचवला. हल्लेखोरांनी महिलांवर अत्याचार केल्यानंतर त्यांच्या जवळील ९५०० रुपयांची रोकड लुटून घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांकडून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पीडित महिलांना खासगी रुग्णालयात हलवणार?

सदर घटनेनंतर महिलांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची इच्छा असल्यास त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .