बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनाची लस घेतलेल्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

पाटणा | सध्या देशात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरवले आहेत. त्यादरम्यान कोरोनावरची लस आली आहे. आता त्या लसीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. असे असतानाच एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याबरोबरच लस घेतलेल्या 9 विद्यार्थ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

एमबीबीएसच्या शेवटच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला होता. त्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याचे नाव शुभेंदू असे आहे. तो बेगुसराय जिल्ह्यातील दहिवा गावातील होता. त्याने 2016 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्याचा मृत्यू 1 मार्चला झाला.

शुभेंदू हा महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होता. त्याला 24 फेब्रुवारीला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होवू लागला. त्यानंतर त्याची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्याच्यासोबत राहणाऱ्या 9 विद्यार्थ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

सिरम इन्स्टिट्यूट ही ‘कोविशिल्ड’ या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहेत. ही लस आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ही आहे. सध्या दोन कोरोना लशी उपलब्ध असून, अजून सात कोरोना लशींवर काम सुरु असल्याचे सरकारने नुकतेच जाहीर केले आहे.

 थोडक्यात बातम्या – 

माझी थट्टा करा पण… मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं ‘हे’ कळकळीचं आवाहन

पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘या’ बड्या गुंडाला घरात घुसून ठोकल्या बेड्या

एका षटकात ‘या’ खेळाडूने ठोकल्या 28 धावा, चक्क! स्टेडियममधील खुर्चीचं तोडली – पाहा व्हिडीओ

बिकनी शूटसाठी अभिनेत्री 2 दिवस उपाशी ‘हे’ आहे कारण

कोरोना व्हायरस म्हणतोय ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More