बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंटची लागण

दिब्रुगड |  कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशात सगळ्या ठिकाणी कोरोनाप्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. सरकारकडून लसीचे दोन्ही डोस घेण्याचं नागरिकांना आवाहन केलं जात आहे. अशातच एक आसाममध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आसाममधील एका डॉक्टर महिलेला एकाच वेळी कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली असल्याचं समजत आहे. दिब्रुगड येथील इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात केलेल्या चाचण्यांवरून हे स्पष्ट झालं आहे. एकाच वेळी या दोन्ही व्हेरिएंटची लागण होण्याची ही पहिलीच केस असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही व्हेरिएंटची लागण झालेल्या महिलेनं कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. दुसरा डोस घेतल्यानंतर साधारण एक महिन्यानंतर डॉक्टर महिलेला दोन्ही व्हेरिएंटची लागण झाली. या महिलेला सौम्य लक्षण असल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल न करता, तिच्यावर घरच्या घरीच उपचार करून ती बरी झाली. संबंधित महिलेचे पतीही डॉक्टर असून, त्यांनाही एका व्हेरिएंटची लागण झाली होती.

जेव्हा दोन व्हेरिएंटच्या व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येतात. तेव्हाच एकाच वेळी दोन्ही व्हेरिएंटची लागण होत असल्याचं, प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रातले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. जे.  बोर्काकोटी यांनी सांगितलं. तसेच एखाद्या व्यक्तीला एका व्हेरिएंटचा संसर्ग होता. त्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या शरिरात अँटीबॉडीज विकसित होण्याआधीच ती व्यक्ती एखाद्या व्हेरिएंट संसर्गाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्या व्यक्तीला दुसऱ्या व्हेरिएंटचाही संसर्ग होऊ शकत असल्याचंही बोर्काकोटी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“काहीही न करता पैसे कसे कमवतो?”; राज कुंद्राच्या अटकेनंतर ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!

“मिटकरी, तोंडाला लकवा झाला होता ना तुमच्या, गावरान गाईचं तूप लावा”

“महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये तातडीने लॉकडाऊन जाहीर करा”

“मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख आता मिस्टर इंडिया झालेत”

“…तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोटांगण घातलं असतं”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More