मुंबई | मुंबईतील नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव डॉ. तुपे असून त्याचं वय 26 वर्षे होतं. हा प्रकार 15 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडला आहे. या घटनेची आग्रिपाडा पोलिसांनी नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीनूसार आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
डॉ. तुपे नायर रुग्णालयात ‘एनस्थिया’ म्हणजेच भूल देणारे डॉक्टर होता. काल दिवसभर त्यांनी नेहमीप्रमाणे काम केलं . रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी काही औषध घेतली. त्यांनी घेतलेल्या औषधांचा ओव्हर डोझ झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, नायर रुग्णालयात मागील वर्षी डॉ. पायल तडवीने आत्महत्या केली होती. पायल अनुसूचित जातीची असल्याने तिला तिच्या सिनिअर डॉक्टरने जातीवरुन टोमणे मारले होते. त्यामुळे तिने आत्महत्येचं पाऊल उचललं होतं, असा आरोप पायलच्या कुटुंबियांनी केला होता.
थोडक्यात बातम्या-
सर्वात आधी पुणेकरांना कोरोनाची लस द्या; थेट पंतप्रधान मोदींकडे मागणी
भाजप श्रीलंकेत सत्तास्थापन करणार; श्रीलंकेने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
उस्मानाबाद जिल्ह्यातील जवान सागर तोडकरी पठाणकोटमध्ये शहीद!
‘शेतकरी घरी असते तरी ते मेलेच असते ना’; ‘या’ भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
भेटी लागे जिवा… विठुराया आणि भक्ताच्या ‘या’ भेटीनं साऱ्यांचे डोळे पाणावले!