बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! अभिनेत्री ऐश्वर्या रायला ईडीचा समन्स, ‘या’ प्रकरणात नाव आलं समोर

मुंबई | मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या (Aishwarya rai) अडचणींमध्ये सापडली आहे. पनामा पेपर्स लीक (Panama Paper Leaked) प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजार रहावं लागणार आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत.

पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. अनेकांची झडती घेतली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात ऐश्वर्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. याविषयी अजून चौकशी सुरु आहे.

थोडक्यात बातम्या – 

“2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या…”रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली

‘बाजारू अमोल मिटकरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तळवे चाटून झाले असेल तर…’; राम सातपुतेंचा हल्लाबोल

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, आता मिळणार ‘ही’ मोफत सुविधा

लस घेतलेल्या ‘इतक्या’ भारतीयांना Omicronचा धोका, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

‘सत्तेत मांडीला मांडी लावून बसता आणि इथे एकमेकांना…’; प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर घणाघात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More