बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कोरोनाबाधित वृद्ध जोडप्याची ‘या’ कारणामूळे रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या

जयपूर | कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देश होरपळून निघत आहे. अशातच देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोरोनाची लागण झालेल्या एका वृद्ध जोडप्यानं रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

आपल्यामुळं नातवाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून या आजी आजोबांनी हे टोकाचं पाऊल उचललं. आपल्यामुळं नातवावर कोरोनाचं सावट येऊ नये, या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळं मात्र, त्यांच्या कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.

घटनेनंतर, पोलीस उपअधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी सांगितलं की, सदर दांपत्यांनी रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली आहे. रेल्वे काॅलनी परिसरात राहणारे 75 वर्षीय हिरालाल बैरवा आणि त्यांची 75 वर्षीय पत्नी शांती बैरवा या दोघांची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. त्यामूळे ते दोघेही निराश झाले होते. त्यांनी गृह विलगीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, आपल्यामुळे आपला नातू रोहित याला कोरोनाचा संसर्ग होईल, याची त्यांना भीती वाटत होती.

दरम्यान, रविवारी घरातील कोणालाही न सांगता हिरालाल बैरवा आणि त्यांची पत्नी शांती बैरवा घरातून निघून गेले. त्यानंतर दोघे रेल्वे स्थानकावर गेले, कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे रूळावर दोघांनी चालत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. तर, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या दांपत्याच्या मुलाचं आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या

विवाहीत प्रेयसीला भेटायला जाणं पडलं महागात, गावकऱ्यांनी दोघांना विजेच्या खांबाला बांधलं अन्…

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी 27 वर्षांच्या संसारानंतर घेतला पत्नीशी घटस्फोट

खुशखबर! सर्वांची कोरोना संकटातून अखेर सुटका होणार; ‘या’ संशोधनाचा निष्कर्ष आला समोर

पंढरपूरमध्ये पुन्हा पोटनिवडणूक घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

“चांगली गोष्ट करण्यासाठी गैरमार्गाचा वापर झाला तर त्या मागचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More