बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! कर्मचारी ऑक्सिजन सपोर्टवर असतानाही जबरदस्तीनं बोलवलं कामावर अन्…., पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | एकीकडे देश कोरोना संकटाचा सामना करत आहे तोच दुसरीकडे कोरोना काळात अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचं समोर येत आहे. अशातच आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

झारखंडमधील बोकारोमध्ये पंजाब नॅशनल बँकेमध्ये काम करणाऱ्या अरविंद कुमार या कर्मचाऱ्याला अपुऱ्या ऑक्सिजनचा सामना करावा लागत होता. बँकेकडून वारंवार बोलावलं जात असल्याने ते ऑक्सिजन सपोर्टवर असताना बँकेत पोहोचले. अरविंद यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. अरविंद ऑक्सिजन सिलेंडरसह तोंडावर मास्क लावून बँकेत पोहोचले. त्यांना पाहून बँकेत बराच काळ गोंधळ उडाला.

याविषयी बोलताना अरविंद कुमार यांनी सांगितलं की, ते काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांनी सांगितलं की, 10 दिवसांपर्यंत ताप होता, त्यानंतर ते ठीक झाले. मात्र त्यानंतरही त्यांच्या फुप्फुसात कोरोना संसर्गाचा परिणाम दिसत होता. 10 दिवसांनंतरही ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. अरविंद यांनी आरोप केला आहे की, अशा परिस्थितीतही बँकेतून त्याला कामावर बोलावले जात आहे. शेवटी वैतागून त्याने राजीनामा दिला, मात्र त्याचा राजीनामा मंजूर करण्यात आला नाही.

दरम्यान, संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. आॅक्सिजन सिलेंडर, रेमडेसिविर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या – 

देसी जुगाड! वाफ घेण्यासाठी तरुणानं लढवली अनोखी शक्कल, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! लाॅकडाऊनचा नियम मोडल्यानं पोलिसांनी मुलाच्या हाता-पायावर ठोकले खिळे?

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

“म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नाहीत, राज्यसरकारची घोषणा फसवी”

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More