बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | राज्यात खळबळ माजवणारी एक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मोठा चाहता आहे. ‘सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा’, असा मेसेज राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता. आदित्य यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवर आरोपीने संदेश पाठवून धमकी दिली होती.

धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीला मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर सेलने (Mumbai Police) बंगळुरूहुन अटक केली आहे. सुशांतच्या या चाहत्यानं 8 डिसेंबरच्या रात्री राजपूतने यांना फोन केला होता आदित्य ठाकरे यांना फोन केला होता मात्र त्यांनी फोनवर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे त्यानं आदित्य ठाकरे यांना मेसेज केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांना जीवे ठार मारण्याचा मेसेज आल्यानंतर रितसर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या आरोपीला ताब्यात घेतलं.

 थोडक्यात बातम्या – 

राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसणार; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेतील तिसरा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर

‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे’; दानवेंची सरकारवर बोचरी टीका

“आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे सरकार आहे”

चहामध्ये फक्त ‘या’ दोन गोष्टींचा वापर करा आणि घरबसल्या झटपट वजन कमी करा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More