देश

‘सरकारी कर्मचारी आपलं काम करत नाहीत’; शेतकऱ्यानं पंचायत कार्यालयात केली आत्महत्या

महिसागर | गुजरातमधील महिसागर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. एका शेतकऱ्याने पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

शेतकरी वारंवार शासकीय मदतीसाठी पंचायत कार्यालयात चक्कर मारत होता. मात्र शासकीय योजनेचा लाभ न मिळाल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

गुजरातच्या महिसागर जिल्ह्यातील बाकोर गावात राहणाऱ्या शेतकरी बलवंतसिंग याने पंचायत कार्यालयात गळफास लावून घेतला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी बलवंतसिंगने बाकोर पोलिस ठाण्यात फोन केला असता तपासात निष्पन्न झालं आहे. हा फोन पंचायत कार्यालयातून करण्यात आला होता. त्या वेळी शेतकर्‍याने पोलीस कर्मचाऱ्याला सांगितलं की सरकारी कर्मचारी आपलं काम करीत नाहीत त्यासाठी मी आत्महत्या करणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब!

….म्हणून त्याने भररस्त्यावर गर्लफ्रेंडवर गोळी झाडून नंतर स्वत: आत्महत्या केली; मुंबईतील घटनेने खळबळ

शिवसेनेचा आणखी एक नेता ‘ईडी’च्या रडारवर?

कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल- रोहित पवार

पुढचे दोन दिवस राज्यातील ‘या’ भागात पावसाचा इशारा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या