बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! एकाच कुटुंबातील 5 जणांनी फाशी घेत संपवलं जीवन

नवी दिल्ली | बिहारच्या सुपौर जिल्ह्यातील संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आई-वडील आणि तीन मुलांची एकाच वेळेस आत्महत्या झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे कुटुंब कोळसा विकून त्यांचा गुजारा करत होते. मात्र आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊलल्याचं बोललं जात आहे.

राघोपूर ठाणाच्या गद्दी गावातील वार्ड 12 मधील ही घटना असून काही दिवसांपासून हे कुटुंब गावातील लोकांना सोडून लांब राहू लागले होते. या कारणामुळे त्यांची चौकशी करण्याचंसुद्धा गावातील लोकांनी बंद केलं होतं. या कुटुंबाला लोकांनी शनिवार नंतर परत कधीच पाहीलं नसल्याचं गावातील लोकांनी सांगितलं. मात्र या घटनेची माहिती मिळताच पोलिस रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. तेव्हा पोलिसांना मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी एफएसएलची टीम बोलावून मृतदेह खाली उतरवले.

या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे मिश्रीलाला यांनी त्यांची जमिन देखील विकली होती. सामुहिक आत्महत्यानंतर जिल्ह्याचे एस पी मनोज कुमारांनी या प्रकरणाची दखल घेतली. कुटुंबातील पाच जणांचा एकाचवेळी मृत्यू झाल्यामुळे प्रशासन देखील हैराण झालं आहे. मात्र या घटनेची कडक चौकशी करण्यात यावी, असा आदेश मनोज कुमारांनी दिला आहे.

दरम्यान, या कुटुंबानी शुक्रवारी रात्री अचानक आत्महत्या केली असून याबाबत एफएसएलची टीम अधिक तपास करत आहे. तसेच संपुर्ण तपास केल्यानंतर सत्य काय ते समोर येईल, असं एसपी मनोज कुमार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘पैसे नसतील तर शरीरसुख दे, त्यानंतर ऑर्डर काढतो’; अधिकाऱ्याची महिलेकडे धक्कादायक मागणी

नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित आणखी एक चित्रपट येतोय; ‘हा’ अभिनेता साकारणार मोदींची भूमिका

रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अखेर अटक!

कंगणा राणावतची आता थेट महात्मा गांधींवर टीका, म्हणाली…

रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More